उन्हाळ्यात सीनाचे तिसरे आवर्तन सुटणार

कर्जत (प्रतिनिधी) : सीनापट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या धरणाचे तिसरे उन्हाळी आवर्तन मिळावे यासाठी संपतराव बावडकर व भारतीय जनता पार्टी मिरजगाव शहर व शेतकरी बांधव यांच्या वतीने  प्रा राम शिंदे यांना निवेदन देण्यात आले होते, त्या निवेदनाची व शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत आ राम शिंदे यांनी आवर्तन सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आ राम शिंदे यांना शेतकऱ्यांविषयी असलेली तळमळ व पाण्याची असलेली गरज ओळखून पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती मिराजगाव भाजपचे शहराध्यक्ष अभिजित जवादे यांनी दिली.


अभिजित जवादे यांनी पुढे म्हंटले आहे की, आ  शिंदे यांनी सोमवार (दि. २२ मे) रोजी तात्काळ सीना चे तिसरे आवर्तन सोडावे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत,  त्याबद्दल सीना पट्ट्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आ राम शिंदे साहेब यांचे हार्दिक आभार,  शेवटी नुसत्या राजकीय टीका टिपण्या करण्यापेक्षा मतदार संघातील शेतकऱ्यांना जे हवं आहे ते देणारा खरा भूमिपुत्र आ राम शिंदे . मतदारांची जाण असणारा नेता कुठे आणि खर्डा येथे निवेदन देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना  "बसायचं असेल तर बसा" असे उत्तर देऊन प्रश्नाकडे पाठ फिरऊन  जाणारे प्रतिनिधी कुठे याच्यातून फरक लगेच लक्षात येतो शेवटी आपला तो आपलाच . सीनापट्ट्यातील लाभधारक  शेतकऱ्यांच्या वतीने आ राम शिंदे यांचे  आभार.