केंद्र शासनाकडून (Central Government) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (pm kisan yojna) योजना राबविली जाते. त्यानुसार वर्षातून तीनवेळा प्रत्येकी दोन हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर (Subsidy on account of farmers) वर्ग करण्यात येते. मात्र, यातील काही शेतकरी बँक खात्याशी आधार न केल्याने लाभापासून वंचित (Deprived of benefits) राहत आहेत. त्यामुळे टपाल विभागाने (By the Department of Posts) गावातच आधार कार्ड लिंक (Aadhaar Card Link) करून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
पीएम किसान सन्मान योजनेसाठी(kisan sanman nidhi) बँक खात्याशी आधार (Aadhar) लिंक असणे आवश्यक आहे. अनेक शेतकऱ्यांचे आधार लिंक नसल्याने त्यांना योजनेचा हप्ता मिळत नाही, त्यामुळे प्रत्येक गावात टपाल विभागात(post office) खाते उघडल्यावर त्या खात्याशी आधार लिंक करून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, तसेच ज्या बँकेत खाते (Bank account) आहे त्या खात्याशी बँकेत जाऊन आधार लिंक करणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मे महिन्याच्या शेवटी जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे शेतकरी या लाभापासून वंचित (Farmers deprived of benefits) आहेत. त्यांनी २५ मेपर्यंत आपले बँक खाते आधारशी लिंक करून घेणे आवश्यक आहे.
गावातील पोस्टात करा आधार लिंक.. (Do Aadhaar link in village post)
प्रत्येक गावातील पोस्ट कार्यालयात बँक खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पीएम किसान हप्ता माहिती Click Here.
पीएम किसानसोबतच मिळणार नमो योजनेचा लाभ (Benefit of Namo Scheme)
केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांची मदत देण्यात येते. त्याच धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पामध्ये नमो निधी शेतकरी सन्मान निधी योजना (Namo Nidhi Farmers Samman Nidhi Scheme) राबविण्याचे ठरविले आहे. मे महिन्याच्या शेवटी पीएम किसान योजनेसोबतच नमो योजनेचे पैसे लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होणार आहेत. शेतकऱ्यांना आता सहाऐवजी बारा हजार रुपये (Farmers now get twelve thousand rupees instead of six) प्रतिवर्षी मिळणार आहेत.
...तरच मिळेल पीएम किसान योजनेचा हप्ता
(Pm kisan) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हवा असल्यास बँक (bank) खात्याशी आधार (adhar) जोडणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया न केल्याने काही शेतकरी (farmer) लाभापासून वंचित आहेत.



