कर्जत (प्रतिनिधी) : पर्यावरणाच्या रक्षणासाठी , झाडे लावण्यासाठी अनेक संघटना काम करत आहेत, मात्र विनाकारण झाडे तोडून पर्यावरणाचा ह्रास करणारे समाजकंटक अजूनही पहावयास मिळत आहेत. 

तालुक्यातील कोंभळी बसस्थानक व गावठाण परिसरात अनेक वर्षांपूर्वी लावलेली नांदूरकीची मोठी झाडे आहेत, मात्र बसस्थानकाजवळ असलेले नांदूरकीचे झाड समाजकंटकांनी शनिवारी रात्री कापून टाकले आहे. 

रात्रीत झाड कापून टाकल्यामुळे कोंभळी मधील निसर्गप्रेमीं कडून संताप व्यक्त केला जात आहे, तसेच संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.