कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना व सामान्य जनतेला तालुक्यातील विविध शासकीय संस्थांमध्ये कामासाठी जात असताना टेबलाखालून पैशाची मागणी होत आहे अशा तक्रारी मनसेकडे अनेक शेतकऱ्यांनी व सामान्य जनतेने केल्या आहेत. तालुक्यातील तलाठी कार्यालय असतील, भूमी अभिलेख कार्यालय असतील, ग्रामविकास अधिकारी असतील अशा अनेक तक्रारी मनसेचे तालुकाध्यक्ष सचिन सटाले यांच्याकडे आल्या आहेत.
त्यामुळे तालुक्यामध्ये अशा पद्धतीने जर कोण शेतकऱ्याची सर्व सामान्य माणसांची पिळवणूक करत असेल तर तात्काळ मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून लाच न देता आपले काम करून घ्यावे असे आव्हान मनसेचे तालुका अध्यक्ष सचिन सटाले यांनी केले आहे. तालुक्यातील विविध प्रश्नावर मनसे नेहमी आवाज उठवत आहे, अशा पद्धतीने छळवणूक व फसवणूक जर होत असेल तर यापुढे पक्ष गप्प बसणार नाही असा इशारा देण्यात आला आहे, यावेळी आबासाहेब उघडे, निखिल जगधने ,विशाल भुसारे,विनोद थोरात,अथर्व तरटे ,सागर पाटील ,मनोज निंबाळकर ,राजेंद्र गायकवाड आदीसह मनसैनिक उपस्थित होते.


