आ शिंदेंची आ पवारांवर टीका.

कर्जत (प्रतिनिधी) :  विजयी झाल्यानंतर त्यांना घरी बोलवून सन्मान केला, पराजय झाला तरी मी खचलो नाही, मनाने हरलो नाही, पराभव पचवता येतो, आम्ही पचवला परंतु आम्ही आमदार झाल्यावर मूग गिळले होते का ? अश्या शब्दात आ राम शिंदे यांनी आ रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे.

ते कर्जत तालुक्यातील रेहकुरी  येथे सोशल मिडिया प्रभावशाली व्यक्ती मेळाव्याप्रसंगी बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, प्रवीण घुले, तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, शेखर खरमरे, पप्पूशेठ धोदाड, राहुल गांगर्डे, अनिल गदादे आदी पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी प्रविण घुले,सुनील यादव,  विनोद दळवी, अशोक खेडकर, डॉ विलास राऊत,आदींनी यावेळी मनोगते व्यक्त करत सोशल मीडियावर विचार मांडले.

पुढे बोलताना आ शिंदे म्हणाले की, अडीच वर्षाच्या कालखंडात यांनी धुमाकूळ घातला, एक वर्षात तुकाई चारीचे काम का नाही झाले, मंजुरी नव्हती तर इंजिनिअर वर कारवाई का नाही केली, गावात पाणी नाही आलं तर कोणी बोलत नव्हते, गावच्या यात्रेत हस्तक्षेप झाला तरी कोणी बोलत नव्हते, बोलायला काही नसल्यानंतर माणसं चिडचिड करतात आणि बौद्धिक विचाराने विचाराची लढाई लढली पाहिजे. 

 दडपशाहीच राजकारण लोक निमितपणे बघत असतात आणि योग्य वेळ आल्यानंतर उत्तर देत असतात त्यामुळेच काकासाहेब तापकीर आपल्या गोटात सामील झाले आणि अन्याय झाल्यामुळे ते आपल्यामध्ये आले आणि त्यांना पण आपण चांगल्या पद्धतीने स्वीकारलं आणि त्यांना स्वीकारलच नाही तर सभापती देखील केलं असे आ शिंदे बोलताना म्हणाले. 

या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे ९ वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये घेतलेले लोकोपयोगी आणि देशातील जनतेच्या हिताचे निर्णय हे सांगणं अतिशय महत्त्वाचे आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व  सूत्रसंचालन शेखर खरमरे यांनी केले तर आभार पप्पूशेठ धोदाड यांनी मानले.

■ एमआयडीसी होणार का नाही. 

कर्जत जामखेडला एमआयडीसी होणार का नाही यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आ शिंदे म्हणाले की, एमआयडीसीच्या संदर्भांमध्ये विद्यमान आमदार यांनी वेगवेगळी वक्तव्ये केली आहेत, स्वतःचे सरकार असताना , त्यांच्या पक्षाचे सरकार असताना कुठलीही कार्यवाही केली नाही, कर्जत जामखेडच्या जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. फक्त विरोधक होऊ देत नाहीत असे चित्र निर्माण करण्यासाठी हा विद्यमान आमदारांचा केविलवाणा प्रयत्न आहे. पण जेव्हा केव्हा करायची तेव्हा मी या भागातला, परिसरातला एक कार्यकर्ता म्हणून, माजी आमदार म्हणून विपचा सदस्य म्हणून एमआयडीसीचा योग्य त्या वेळी पाठपुरावा करेल, आणि कर्जत जामखेडला एमआयडीसी आणेल असे आ शिंदे यांनी सांगितले.