कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी येथील एकाची श्रीगोंदा न्यायालयाने विनयभंगाच्या केसमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की जुलै २०१८ मध्ये फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी प्रमाणे आरोपी नामे राहुल बबन बिटके रा. बिटकेवाडी ता. कर्जत जि. अहमदनगर याने फिर्यादी ही सायंकाळी ७.०० वाजण्याचे सुमारास काम करुन घरी जात असताना मोटारसायकल आडवी लावून तिचा विनयभंग केला अशी फिर्याद दाखल केली होती. फिर्यादी प्रमाणे कर्जत येथिल न्यायालयात केस चालली व आरोपी राहुल बबन बिटके यास दोषी धरण्यात आले होते. त्यानंतर आरोपीने श्रीगोंदा येथील न्यायालयात अपिल दाखल केले. सदर अपिलाचा रोजी निकाल झाला व श्रीगोंदा येथिल जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपी याचे वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपी तर्फे अॅड. क्षिरसागर भाऊसाहेब पांडुरंग यांनी काम पाहिले.


