कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत मधील सर्व सामाजिक संघटनांनी २ ऑक्टोबर २०२० पासुन सुरू केलेल्या अभियानाला नुकतेच १ हजार दिवस पूर्ण झाले, सर्व सामाजिक संघटनांच्या श्रमदानाच्या १ हजार दिवस पूर्तीनिमित्त तालुक्यातील भोसे येथील श्री संत बाळूमामा प्रतिष्ठानच्या वतीने बाळूमामा मंदिर परिसरामध्ये वृक्षारोपण करून शुभेच्छा दिल्या, सर्व सामाजिक संघटनांच्या कार्याची प्रेरणा आणि मार्गदर्शनाखाली बाळूमामा प्रतिष्ठान तीन वर्षांपासून वेगवेगळया वृक्षांची मंदिर परिसरात लागवड करत असुन भर उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असतानाही टँकरने पाणी देऊन वृक्षांचे संवर्धन केले जात असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने दिगंबर ढोले यांनी दिली. याप्रसंगी भोसे गावचे माजी सरपंच राजेंद्र केशव ढोले, बाळासाहेब क्षिरसागर, वैभव हराळ, दिलीप सोनवणे, मोहन ढोले, अभिषेक ढोले, दिलीप ढोले,कल्याण गोसावी तसेच जेष्ठ नागरीक बबन क्षिरसागर, शेवराव क्षिरसागर उपस्थित होते.


