कर्जत (प्रतिनिधी) : दारू पिऊन झालेल्या बापलेकाच्या भांडणात बापाने मुलाचा खून केल्याची खळबळजनक घटना कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत विमल रोहिदास लाढाणे( रा.डिकसळ ता. कर्जत जि. अनगर ) यांनी मिरजगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून , याप्रकरणी रोहिदास बापूराव लाढाने (रा.डीकसळ तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबत फिर्यादीत दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचा मुलगा अमोल व पति रोहिदास हे दोघे दारू पिऊन येऊन घराच्या पत्र्याचे पडवीत बसलेले असताना त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली व त्यावेळी त्यांना गप्प बसा भांडण करू नका असे फिर्यादी व फिर्यादीची सून त्यांना समजावून सांगत असतानाच फिर्यादीचा मुलगा अमोल याने आरोपी रोहिदास यांना घाण घाण शिवीगाळ केली व हाणामाऱ्या सुरू झाल्या व घराचे पत्र्याचे पडवीच्या बाहेर त्या हाणामारीत फिर्यादीचा मुलगा ओट्यावरून खाली पडला ते पाहून आरोपी यास मयत अमोल याने घाण घाण शिवीगाळ केली या कारणावरून रागाचे भरात तिथेच पडलेले सिमेंट ब्लॉक उचलून आरोपी रोहिदास याने फिर्यादीचा मुलगा अमोल याच्या डोक्यात टाकला व पुन्हा सिमेंट चा दुसरा ब्लॉक उचलून तोंडावर टाकून त्याला जीवेठार मारून त्याचा खून केला आहे, फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्यासह मिरजगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल माळशिखरे यांनी घटनास्थळी भेट दिली,आरोपी रोहिदास बापूराव लाढाने याला मिरजगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे हे करत आहेत.
%20(1).jpeg)

