कर्जत (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कर्जत तालुका अध्यक्ष सचिन हनुमंतराव सटाले यांचा वाढदिवस नगर येथे साजरा करण्यात आला. नेहमीच सामाजिक उपक्रम करणारे सटाले समाजातील तळागाळातील लोकांच्या प्रश्नांना आवाज उठवणारे त्यामुळे तरुणांचा त्यांना नेहमी पाठिंबा असतो.


 शेकडो तरुणांनी विविध माध्यमांतून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शुभेच्छांचा वर्षाव केला. प्रसंगी जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर साहेब ,जिल्हाध्यक्ष सचिन डफळ ,सचिव नितीन भूतारे, आबासाहेब उघडे, विशाल भुसारे, लक्ष्मण कानडे , निखिल जगधने, अथर्व तरटे, रोहित कानगुडे, अमोल गांगर्डे, राजेंद्र गायकवाड, तूषार जाधव, आदी मनसैनिक व जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष सचिव कार्यकर्ते उपस्थित होते.