कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत शहरात कोमल फोटोज् आणि फ्रेमच्या दालनाचे दिमाखात उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

आकाश धोंडिबा बिडगर व विकास धोंडिबा बिडगर हे कोमल फोटोज् आणि फ्रेमच्या माध्यमातून कर्जत मध्ये गेल्या सात वर्षा पासुन ग्राहकांना उत्तम प्रकारे सेवा देत असून त्यांच्या शाखा नंबर २ चा उद्घाटन समारंभ आजोबा एकनाथ किसन बिडगर, वडील धोंडिबा एकनाथ बिडगर, आई, तसेच दादा पाटील महाविद्यालय चे प्राचार्य डॉ संजय नगकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 यावेळी दादा पाटील महाविद्यालयाचे शिक्षक,  कर्जत व करमाळा KKR फोटग्राफर युनियन चे अध्यक्ष व उपाध्यक्ष व सर्व युनियन चे सदस्य उपस्थित होते. कोमल फोटोज् आणि फ्रेमच्या माध्यमातून याठिकाणी मॉडेलिंग फोटो, इनडोर फोटो, सर्व साईज मध्ये फ्रेम, झेरॉक्स, लमिनेशन, ऑनलाईन फॉर्म, सर्व शुभकार्याच्या ऑर्डर घेतल्या जाणार आहेत.