कर्जत (प्रतिनिधी) : भाजपा पदाधिकारी शेखर खरमरे यांनी आमदार रोहित दादा पवार यांच्या बद्दल जी भूमिका मांडली त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते प्रतिक काकडे यांनीही त्यांच्यावर पलटवार केला आहे.
आमदार राम शिंदे यांना १० वर्षात काय विकास करता आला असा प्रश्न उपस्थित करत त्यांना मतदारसंघाची किती काळजी होती हे लोकांनी बघूनच लोकांनी त्यांना २०१९ च्या विधानसभेच्या निवडणूकीत धूळ चारली. त्यांचा झालेला पराभव हा भाजपा पदाधिकारांच्या खूपच जिव्हारी लागला आहे त्यामुळे हे पदाधिकारी अशा टिका आमदार रोहित दादा पवार यांच्यावर करत असतात.कालच कर्जत भाजपा सरचिटणीस शेखर खरमरे यांनी रोहित पवार यांच्या बद्दल बोलताना सांगितले की हा मतदारसंघ हा रोहित पवार यांच्या मालकीचा नाही.आमदार रोहित दादा यांनी कुठल्या माध्यमातून सांगितले आहे की हा मतदारसंघ माझ्या मालकीचा आहे म्हणून..? आमदार राम शिंदे यांनी ऊत्तर द्याव की त्यांना का १० वर्ष त्यांच्या आमदार आणि मंत्री पदाच्या कारकिर्दीत आणि आता विधान परिषदेवर असताना देखील त्यांना साधा कर्जत च्या सामान्य जनतेसाठी एस.टी डेपो करता नाही आला.त्यांच्यासारख्या लोकांनी आमदार रोहीत दादा पवार यांच्या वरती बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही.सामान्य लोकांच्या कामांविषयी बोलायचा सोडून हे भाजपा पदाधिकारी मात्र राम शिंदे यांचा जयजयकार करण्यात व्यस्त आहेत.ही फक्त राजकीय आकसापोटी केलेली टीका आहे.जनतेला सगळ माहित आहे कोण काम करतय आणि कोण फक्त गप्पा मारून जनतेला फसवतय ..! त्यामुळे उलट भाजपा पदाधिकारांना आमदार रोहित दादा पवार यांच्या मागे सामान्य जनता किती भक्कम पाठीशी आहे हे दिसत असल्यामुळे केवळ राजकीय हेतूने बोलून प्रकाश झोतात राहण्यात त्यांना आनंद वाटतोय.आमदार रोहित दादा पवार यांची काम ही सामान्य जनतेला दिसत असुन त्याचे त्यांना कुठल्याही प्रकारे गाजावाजा करण्याची आवशकता वाटत नाही…आणि याच विकास कामांच्या जोरावर आमदार रोहित पवार २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत परत एकदा मोठ्या मताधिक्याने निवडूण येतील यात काही शंका नाही..


