कर्जत (प्रतिनिधी) : २०१८ मध्ये मंजूर झालेला कोंभळी फाटा कर्जत रस्त्याचे काम २०२३ मध्येही अपूर्णच असून ठेकेदाराने निकृष्ठ दर्जाचे काम करत रस्ता कसाबसा पूर्ण करण्याचे ठरविले आहे.
सध्या कोंभळी फाटा ते कर्जत रस्त्याच्या कडेने झाडांची रोपे लावण्याचे काम सुरू आहे, मात्र ठेकेदाराने या रोपमध्ये अनेक अगोदरच जळालेली रोपे लावली आहेत, त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे, बरीच रोपे अगोदरच जळालेली असून लावलेल्या रोपांना पुरेसे पाणी घालण्यात आलेले नाही. दोन आमदारांच्या मतदारसंघात अधिकाऱ्यांवर वचक राहिलेला नसल्याने विकासकामे निकृष्ट दर्जाची होताना दिसत आहेत.


