कर्जत (प्रतिनिधी) : दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे कार्यरत असलेले सहाय्यक प्राध्यापक श्रीपाद मुकुंदराव पाटील यांना लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाब विद्यापीठाकडून दि. २२/०८/२०२३रोजी रसायनशास्त्र (Organic chemistry )या विषयावर Doctor of philosophy मिळाली.
रसायनशास्त्र विषयांमधील नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये नाविन्य उत्प्रेरक बनवून त्याचे वेगवेगळ्या अभिक्रियांमध्ये उपयोग नोंदवले. या अभ्यासामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे 14 शोध निबंध व एक पेटंट (साउथ आफ्रिका) प्रकाशित केले आहेत. तसेच ते तीन आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी झाले व त्यामध्ये विविध संशोधनावर चर्चा केली. हे सर्व संशोधनाचे काम डॉ. रुणझुण टंडन आणि डॉ. नितीन टंडन यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले.
सध्या ते कर्जत मध्ये दादा पाटील महाविद्यालय येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून रसायनशास्त्र विभागामध्ये कार्यरत आहेत.या कामी त्यांना आई मनिषा पाटील, पंचायत समिती कर्जत येथे कृषि अधिकारी पदावर कार्यरत असणारे वडील मुकुंदराव पाटील तसेच बंधु प्रसाद, वहिनी भाग्यश्री व दादा पाटील महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विषयातील सहाय्यक प्राध्यापिका अर्चना श्रीपाद पाटील पत्नी यांचे मिळालेल्या सहकार्याबद्दल विशेष आभार मानले. माझे आजी आजोबा सुशीला व पोपटराव माधवराव पाटील आणि माझे सद्गुरु संत श्री आसारामजी बापू यांचे आशीर्वाद मिळाले यामुळे हे भाग्य मला मिळाले, असे पाटील यांनी सांगितले


