कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील यशस्वी युवा उद्योजक शरद गुलाबराव तनपुरे यांना नुकतेच अहमदनगर येथील माऊली संकुल सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यस्तरीय वृक्षमित्र पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 

स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र आयोजित मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा अंतर्गत दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार चॉप्सकट व प्रगती नर्सरीचे संचालक शरद तनपुरे यांना देण्यात आला,यावेळी हवामान अभ्यासक पंजाबराव डख,पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे, नागेबाबा उद्योग समूहाचे अध्यक्ष कडूभाऊ काळे, तसेच श्री नरेश राऊत फाउंडेशन चे लक्ष्मण गोर्डे, सरपंच संघाच्या चळवळीतील नेते बाबासाहेब पावसे पाटील, समाजसेवक यादवराव पावसे, अध्यक्ष रोहित पवार, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

चॉप्सकट व प्रगती नर्सरीच्या माध्यमातून शरद तनपुरे यांची व्यवसायात यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे,  त्यांनी वृक्षलागवड व संवर्धनात मोठ्या प्रमाणात काम केले आहे,  वृक्षलागवड व संवर्धनामधील कामाची स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र यांनी दखल घेत तनपुरे यांना राज्यस्तरीय वृक्षमित्र पुरस्कार दिला, पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर तनपुरे यांचे विविध क्षेत्रांमधून अभिनंदन होत आहे.