कर्जत (प्रतिनिधी) :  मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन आ.राम शिंदे यांनी एमआयडीसी कशा प्रकारे होऊ शकत नाही याचे सविस्तर शब्दात दुसर्याचे कागद हातात घेऊन सांगितले पण एमआयडीसी आणण्यासाठी त्यांचे किती प्रयत्न चालू आहेत याबाबत ते जराही बोलले नाहीत.यावरून दिसून येतय की त्यांच्याकडे तरूणांसाठी काहीही व्हिजन नसून ते व्हिजन नसलेले नेते आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रतिक काकडे यांनी केली आहे.

 आमदार असताना राम शिंदे यांच्या काळात २०११-२०१४ दरम्यान त्यांनी नावे घेतलेल्या   ऊद्योगपतींनी जमिनी घेतल्या मग राम शिंदे हे आमदार असताना त्यांच लक्ष हे या मतदारसंघात किती होत हे यावरून स्षष्ट होतय.फक्त आता त्यांनी एवढाच करावं की कर्जत-जामखेड च्या जनतेसाठी आणि तरूणांसाठी आ.रोहित पवार यांचे जे प्रयत्न चाललेले आहेत त्याच्या आड येऊ नये अन्यथा कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्व तरूण रस्त्यावर ऊतरून आ.राम शिंदे यांना जाब विचारू असे राष्ट्रवादी युवकचे युवा नेते मा.प्रतिक काकडे यांनी सांगितले.

२००९ पासून २०१९ पर्यंत राम शिंदे हे आमदार आणि मंत्री होते तर त्यांनी तरूणांसाठी कुठला रोजगार आणला किंवा काय केले याचे उत्तर द्यावे.आ.राम शिंदे यांचेकडे कुठलही व्हिजन नाही त्यामुळे त्यांच या मतदारसंघातील जनतेकडे काडीमात्रही लक्ष नाही आणि ते मुंबई मध्ये पत्रकार परिषदा घेऊन आ.रोहित पवार व कर्जत-जामखेड च्या जनतेला आणि तरूणांना वेठीस धरण्याचे काम करत आहे.त्यांना कर्जत-जामखेड च्या जनतेचा एवढाच कळवळा आहे तर त्यांनी मागे पण आणि आता पण सत्तेत असताना सामान्य लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला कर्जत एस.टी डेपो का नाही केला..? आ शिंदे यांनी दूरदृष्टीने कोणते काम मार्गी लावले आहे ? एखाद्या गोष्टीचा सखोल अभ्यास करून ते काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले का ? अशा अनेक प्रश्नांची ऊत्तर आणि काम करायची सोडून आ.राम शिंदे हे आ.रोहित पवार यांच्यावर टिका करण्यात धन्यता मानत आहेत अशी टिका युवा नेते प्रतिक काकडे यांनी केली आहे.