कर्जत (प्रतिनिधी) : - कर्जत तालुक्यातील श्री क्षेत्र मांदळी येथील युवा ग्रामपंचायत सदस्य सुधीर बचाटे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. अनाठायी खर्चाला फाटा देत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या,पेन,खाऊ असे शालेय साहित्य वाटप करून एक वेगळा उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी सरपंच भगवान गांगर्डे , माजी सरपंच अशोक वाघ , मा. सरपंच बलराम बचाटे , तंटा मुक्ती अध्यक्ष निवृत्ती गांगर्डे, ग्रा.पं.सदस्य नीळकंठ भुजबळ, ग्रा.पं.सदस्य किरण गारूडकर निलेशकाका गांगर्डे तसेच शाळेतील शिक्षक वृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.


