कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक येथील अंबादास विठ्ठल जंजिरे याची श्रीगोंदा येथील अति. जिल्हा व सत्र न्यायालयातील केसमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 

    याबाबत अधिक माहिती अशी कि, ६ सप्टेंबर २०१७ रोजी फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून फिर्यादी हि, ६ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजेनेच्या सुमारास तिचे घराशेजारी असणाऱ्या सौचालयामध्ये सौचासाठी ज्जात असताना आरोपी अंबादास विठ्ठल जंजिरे याने फिर्यादीला चाकूचा धाक दाखवून तिचेवर बलात्कार केला, अशी फिर्याद देण्यात आली होती.

    सदर फिर्यादीप्रमाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होऊन,सदरची केस न्यायालयात चालली , परंतु सदर केसमध्ये पुरेसा पुरावा न आल्याने तसेच सबळ पुराव्याअभावी आरोपीस संशयाचा फायदा देऊन आरोपी नामे अंबादास विठ्ठल जंजिरे याची या केसमधून १४ ऑगस्ट रोजी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

    दरम्यान आरोपी यांच्यावतीने अॅड. क्षिरसागर भाऊसाहेब पांडुरंग यांनी काम पहिले.