कर्जत (प्रतिनिधी) : नुकताच प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम संपले यामध्ये तालुक्यातील अनेक सेतू चालक, आपले सरकार सेवा केंद्र चालक यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याचे काम केले. 

दरम्यान कृषी विभागातील प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल तालुक्यातील चांदे बुद्रुक येथील नवले सेतू केंद्राच्या संचालिका सौ विद्या योगेश नवले यांचा तालुका कृषी अधिकारी पदमनाभ म्हस्के यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.