कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील कोकणगांव येथे डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामतीच्या कृषीकन्यांनी गावातील उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या गोमातेचे पूजन करून ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचा श्रीगणेशा केला.                
        यावेळी कार्यक्रमादरम्यान गावात कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गावात राहायला आलेल्या कृषीकन्यांनी गावकऱ्यांना कार्यानुभव कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा सांगितली. तसेच कोकणगांव ग्रामस्थांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती या संस्थेचे प्रतीक रोपटे देऊन सरपंच श्री महादेव ज्ञानदेव गवारे यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी कार्यक्रमामध्ये उपस्थित श् संतोष सुर्यवंशी समस्त ग्रामस्थांच्या वतीने सर्व कृषीकन्यांचे गावामध्ये स्वागत केले व मार्गदर्शन केले. 
तसेच वेळोवेळी मदत करण्याचे आश्वासनही दिले, सर्व ग्रामस्थांच्या वतीने, सत्कारादरम्यान स्वीकारलेल्या सुपारीची रोपटी कोकणगांव ग्रामपंचायती अंतर्गत उभारलेल्या मंगलकार्यालय परिसरात लावण्याचे व संवर्धनाचे आश्वासन दिले, तसेच कृषीकन्यांनी गावकऱ्यांसोबत शेती विषयक अडचणींची चर्चा करून प्रात्यक्षिके घेण्याचे ठरले, यावेळी कोकणगांव ग्रामपंचायतीचे आजी व माजी सरपंच, उपसरपंच , सोसायटीचे चेअरमन व संचालक  तसेच सर्व ग्रामस्थ  उपस्थित होते. 
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कृषीकन्यांना संस्थेचे मुख्याधिकरी  नलावडे कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.पी.गायकवाड, प्रा. एस.व्ही. बुरंगले  यांनी प्रोत्साहन दिले.  गावकर्यांनी कृषिकन्या कुमारी. प्रज्ञा खराडे, श्रुती धुमाळ, शितल खाडे, श्रावणी जाधव, प्रज्ञा कदम, आसावरी ढोले यांचे कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आभार मानले.