कर्जत (प्रतिनिधी) : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे कर्मचारी तुकाराम घालमे यांची नुकतीच कोंभळी शाखेच्या शाखाप्रमुखपदी निवड झाली, पदोन्नती झाल्यानंतर कोंभळी, मुळेवाडी , कौडाने येथील नागरिकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मुळेवाडीचे माजी सरपंच हरिश्चंद्र जगताप, उद्योजक संतोष सूर्यवंशी, चेअरमन ज्ञानदेव गांगर्डे, चिंचोली रमजानचे सरपंच दिपक ननवरे आदींसह जिल्हा बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.


