कर्जत (प्रतिनिधी) : बाया माणसे पाहून लघवी करतो का  असे म्हणत लोखंडी गजाने मारहाण करत हायवा गाडी पेटवून देण्याची  घटना आज दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास श्रीगोंदा जामखेड रोडवर घडली.

    याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी गौतम कुमार उपेंद्र महातो (वय २३ वर्षे)  राहणार सट्टा, ता.जि –खगडिया, बिहार याने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, गौतम कुमार हा  अशोक लेलँड हायवा क्रमांक एम. एच २४ ए .यू ७७०४ हा हायवा रुई गव्हाण येथून आढळगाव येथे घेऊन जात असताना, रुई गव्हाण शिवारात रुघुवंदन मंगल कार्यालय समोर रोडवर आला असता. फिर्यादी गौतम कुमार हा लघवी करण्यासाठी खाली उतरला होता, त्यावेळी आरोपी परशुराम चंदर ठोकळे  व प्रणव सतीश आल्हाट हे फिर्यादी जवळ आले, व तू बाया माणसे पाहून लघवी करतो का  असे म्हणून दोघांनी फिर्यादीस लोखंडी गजाने मारहाण केली. तसेच साईनाथ जालिंदर ठोकळे ( राहणार रुई गव्हाण,तालुका –कर्जत, जिल्हा –अहमदनगर) याने यातील फिर्यादी व साक्षीदार हे तेथुन जाणेसाठी गाडीत बसलेले असताना, फिर्यादी व साक्षीदार यांना जिवे मारण्याचे उद्देशाने हाईवा गाडीवर पेट्रोल टाकून गाडी पेटवून दिली. व गाडीचे नुकसान केले.  फिर्यादी वरुन गुन्हा रजि. दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे हे करीत आहेत.