कर्जत (प्रतिनिधी) : नाफेडकडून कांदा खरेदी पुन्हा सुरू करण्यात आली असून कर्जत तालुक्यातील मुळेवाडी व गुरवपिंप्री येथील खरेदी केंद्रात नाफेड मार्फत कांदा खरेदी २४ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे.
नाफेड मार्फत पृथाशक्ती फार्मर्स प्रोड्युसर कं. लि व उदयराजे फार्मर्स प्रोड्युसर कं.लि यांच्या संयुक्त विद्यमानाने PSF_2021 - 22 कांदा खरेदी केंद्र मुळेवाडी येथे कांदा खरेदी सुरू होत आहे.
कांदा खरेदी दर नाफेडच्या दररोजच्या बदलत्या दरानुसार असणार आहेत.
आवश्यक कागदपत्रे :-
१) ७/१२ व ८ अ २) आधारकार्ड
३) राष्ट्रीयीकृत बँक पासबुक
शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार फक्त खालील प्रकारचा कांदा खरेदी करण्यात येईल
१) कांदा Size ४५ ते ६५ mm. २) डबलपत्ती कांदा पाहिजे ३) डेंगळे, फूट, काजळी नको
तरी सर्व शेतकऱ्यांनी खालील ठिकाणी संपर्क करावा.
बेंदवस्ती, मुळेवाडी ता. कर्जत
राहुल जगताप :- ९४०३०१०१०५,


