कर्जत (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात गेल्या १५ दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहे. सलग उपोषणामुळे त्यांची प्रकृती ढासळली असून ग्रामस्थांच्या आग्रहास्तव त्यांनी सोमवारी रात्री १२.३० पासून सलाईन आणि उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी त्यांची मागणी आहे. 

दरम्यान ११ सप्टेंबर रोजी तालुक्यातील कोंभळी गावचे ग्रामस्थ विठ्ठल गांगर्डे यांनी उपोषण स्थळी भेट देत मनोज जरांगे यांच्या आंदोलनास कोंभळी ग्रामस्थांच्या वतीने पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी विठ्ठल गांगर्डे यांच्या सोबत इतर सहकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात गेल्या १५ दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषणाला बसलेले आहे, कोंभळी गावच्या वतीने त्याठिकाणी जाऊन त्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला.

- विठ्ठल सोपान गांगर्डे