कर्जत (प्रतिनिधी) : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून मोठा लाठीचार्ज करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू होते. त्या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केला. उपोषण करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला.
या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता असून उद्या शनिवारी सकल मराठा समाज यांच्या वतीने कर्जत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत , या हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या सकल मराठा समाज कर्जत तालुका यांच्या वतीने कर्जत बंदचे आवाहन करत असल्याची माहिती सकल मराठा समाज कर्जत तालुकाचे प्रमूख समन्वयक वैभव लाळगे यांनी दिली.


