कर्जत (प्रतिनिधी) : सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील मिरजगाव येथे घडली. याबाबत मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झुंबर जबाजी विधाते (रा कात्राबाज मांडवगण श्रीगोंदा जि . अ नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी पुनम उर्फ राणी गणेश रासकर ही तिचे लग्न झालेनंतर तिचे सासरी नांदत असताना तु मला आवडत नाहीस मी माझे घरच्यांचे म्हणण्यानुसार लग्न केले आहे लग्नात तुझे आईवडीलांनी मानपान हुंडा दिला नाही असे गणेश नवनाथ रासकर हा तिला म्हणत तिचा वेळोवेळी शारिरिक मानसिक छळ करुन मारहाण शिवीगाळ केली तिचा संसार व्यवस्थित चालावा म्हणुन विधाते यांनी रासकर याला 1,45, 000/-रुपये दिलेले आहेत तरी पण आरोपीने पूनम हिस त्रास दिला त्याचे नेहमिचे त्रासाला कंटाळुन मुलगी पुनम उर्फ राणी गणेश रासकर हीने सासरीघराचे जवळ असलेल्या विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केली आहे व आरोपीने तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याच्या फिर्यादीवरून गुन्हा रजि दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी घटनास्थळी भेट दिली, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे हे करत आहेत.
%20(5).jpeg)

