कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत येथील न्यायालयात चालु असलेल्या N.I.Act sec. 138 च्या केसमधील आरोपी नामे-बजरंग बाबुराव ढोले रा. चंदणनगर पुणे यांची काल दि.०६/०९/२०२३ रोजी निर्दोष मुक्तता करणेत आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी नामे- बजरंग बाबुराव ढोले हे पुणे येथील रहिवाशी असुन फिर्यादी नामे- धनंजय रघुनाथ झांबरे हे हिंगणे, ता. आष्टी, जि.बिड येथील रहिवाशी आहेत. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे फिर्यादीतील मजकुर की, आरोपी यांना सन २०१८ मध्ये पैशांची गरज असलेने आरोपीने फिर्यादी यांना रक्कम रु.७,७५,०००/- (सात लाख पंच्याहत्तर हजार रु. फक्त) एवढ्या पैशांची मागणी केली त्यावेळी फिर्यादी यांनी रोख स्वरुपात आरोपी यांना पैशे दिले त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपीस काही दिवसांनी परत दिलेल्या पैशांची मागणी केली असता आरोपी त्याचे खात्यावरील चेक दिला व सदरचा चेक बँकेत भरणेस सांगितले परंतु सदरचा चेक फिर्यादी यांनी बँकेत भरला असता अपुरा निधी Funds insufficient अशा प्रकारचा शेरा मारुन न वटता परत आला अशी फिर्याद फिर्यादीने आरोपीचे विरुध्द N.I.Act sec.138 प्रमाणे दाखल केली सदर केसमधील पुरावा व आरोपीचे वकीलांचा युक्तीवाद ग्राहय धरुन आरोपीस निर्दोष मुक्त करण्यात आले..
आरोपीचे वतीने अॅड. क्षिरसागर भाऊसाहेब पांडुरंग यांनी काम पाहिले.
%20(6).jpeg)

