कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुका भाजपा तालुका अध्यक्ष पदाची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली, यामध्ये भाजपचे निष्ठावान , अभ्यासू कार्यकर्ते शेखर खरमरे यांची वर्णी लागली आहे.
खरमरे यांनी कोंभळी ग्रामपंचायत मध्ये सरपंचपद भूषवले होते, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक विकासात्मक कामे केली आहेत, सुरुवातीपासूनच त्यांनी पक्षकार्यात स्वतःला झोकून दिले होते. आ राम शिंदे यांचे विश्वासू , जाणते कार्यकर्ते आणि सामाजिक जाणिवेतून फुललेले व्यक्तिमत्व असलेले खरमरे यांनी तालुक्यातील भाजपच्या पडीच्या काळात पक्षाची बाजू परखडपणे मांडून आपले कर्तृत्व सिद्ध केले असल्याने पक्षाने त्यांना संधी दिल्याचे बोलले जात आहे.
शेखर खरमरे यांच्याकडे स्पष्टवक्तेपणा,परखड मत मांडणे यांसह विविध विषयांचे उत्तम ज्ञान आहे.त्यांच्या निवडीने आगामी काळात कर्जत तालुक्यातील जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी खंबीर नेतृत्व मिळाल्याची भावना जनसामान्य नागरिकांकडून ऐकावयास मिळत आहे. भाजप तालुकाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने सर्व स्तरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तर काहींनी फोन च्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या.


