कर्जत (प्रतिनिधी) : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या भारतीय जनता पक्षाच्या निवडी नुकत्याच जाहीर झाल्या, यामध्ये तालुकाध्यक्ष पदाची धुरा पक्षाचे सर्वसामान्य कार्यकर्ते शेखर खरमरे यांच्यावर सोपवण्यात आली, पक्षाने त्यांची सार्थ निवड केल्याने कोंभळी गावांमध्ये फटाके फोडून मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. 

दरम्यान कोंभळी ग्रामस्थांकडून भैरवनाथ मंदिरासमोर शेखर खरमरे यांचा भव्य सत्कार करण्यात आला,  यावेळी कोंभळीचे  सरपंच सचिन दरेकर, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश गोरखे, खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन ज्ञानदेव गांगर्डे, भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस राहुल गांगर्डे, कोंभळी सोसायटीचे चेअरमन गोरख गांगर्डे, बाळासाहेब गांगर्डे, दत्तात्रय मुळे, शिवम उद्योग समूहाचे संचालक संदीप गवारे, माजी सरपंच सिताराम गांगर्डे,भाऊसाहेब गांगर्डे, शिवाजी भापकर, नवनाथ काकडे, साहेबराव काकडे, युवा नेते किशोर गांगर्डे,प्रविण गांगर्डे व ह.भ.प शरद महाराज गांगर्डे आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते,  मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना खरमरे यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळातील विविध योजनांची केलेल्या प्रभावी अंमलबजावणीला उजाळा दिला. खरमरे यांनी आपले विचार मांडून हा सन्मान फक्त माझा नसून समस्त कोंभळीकरांचा आहे .याप्रसंगी पंचक्रोशीतील कोंभळी, खांडवी, मुळेवाडी, कौडाणे, रमजान चिंचोली,थेरगाव मधील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. आभार पशुवैद्यकीय चिकित्सक ज्ञानेश्वर गांगर्डे यांनी मानले.