कर्जत (प्रतिनिधी) : अहमदनगर येथील किडनी विकार तज्ञ डॉ. साईप्रसाद शिंदे हे आता हे प्रथमच कर्जतमध्ये ओपीडीसाठी उपलब्ध असणार आहेत. कर्जत- मिरजगाव रोडवरील डॉ. कापसे यांच्या साई अद्वैत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कर्जत येथे प्रथमच अद्ययावत असे डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. किडनी विकार तज्ञ डॉ. साईप्रसाद शिंदे यांच्या निगरानीखाली हा विभाग चालवला जाणार आहे. डॉ. साईप्रसाद शिंदे हे महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी कर्जत येथे उपलब्ध राहणार आहेत. तरी गरजू रुग्णांनी याचा फायदा घ्यावा. नाव नोंदणीसाठी ७८८८०३४८२६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन डॉ. मनोजकुमार कापसे यांनी केले आहे.