कर्जत (प्रतिनिधी) : करिअर निवडण्याचे कार्य दिमाग से नाही तर दिल से केले जाते. चुकीच्या पायावर करिअर निवडीचा इमला रचला तर तो पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळणारच , तसेच करिअर व्यवस्थापनाचे भूत अगदी लहानपणापासून प्रत्येकाच्या मानगुटीवर कळत-नकळत बसविले जाते. त्यामुळे आपल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांना करिअर कसे घडते, किंवा घडविले जाते याबाबत माहिती मिळावी म्हणून संस्थेचे अध्यक्ष केशव शिंदे यांनी विद्यार्थ्यांना थेट करिअर अकॅडमीचीच सहल घडवून आणली.

तालुक्यातील मिरजगाव येथील जिजाऊ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी येथील टायगर अकॅडमीला भेट देऊन तेथील दैनंदिन नियोजनाचा अभ्यास केला. टायगर करिअर अकादमीत प्रशिक्षण घेतले अनेक विद्यार्थी पोलीस , आर्मी, SRPF मध्ये कार्यरत आहेत,  टायगर अकॅडमीचे संचालक हर्षद चौकडे यांनी विध्यार्थीना सकाळी 5.30 पासून रात्री 9.30 पर्यंत काय नियोजन असते , विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टी शिकविल्या जातात याची सविस्तर माहिती दिली, 100, 1600  मीटर धावणे, गोळा फेक, लांब उडी, इ बाबतीत माहिती दिली.


 पोलीस कॉन्स्टेबल, आर्मी, तलाठी, होमगार्ड, SRPF, इ भरती बाबतीत माहिती दिली तसेच काही इव्हेंटच्या बाबतीत प्रात्याक्षिक करून दाखविले जिजाऊ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचे मराठी, इंग्रजी ग्रामर, अंकगणित, सामान्य विज्ञान, बुद्धीमत्ता यांची विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे अचूक दिली.

 संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशव शिंदे यांनी बोलताना लहापपासूनच विध्यार्थीना आपण ज्या क्षेत्रात जाणार आहे स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी त्याची तयारी बालपणापासून करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला सुरुवात करतील आणि त्यांचे लक्ष्य पूर्ण करू शकतील तसेच कमी वयात देशप्रेमाची भावना मनात टिकून राहावी व भविष्यातील IPS, IAS, पोलीस, आर्मी, SRPF सारख्या क्षेत्रात करिअर करून देशाची सेवा करतील अशी भावना व्यक्त केली   तसेच टायगर अकॅडमीचे संचालक हर्षद चौकडे यांनी बोलताना जिजाऊ इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी खूप हुशार व चाणाक्ष आसल्याचे म्हटले नियमित व्यायामाचे काय फायदे असतात तसेच जिम मधील साहित्य कसे वापरून व्यायाम कसा करायचा याचे प्रात्याक्षिक करून दाखविले लहान वयापासूनच त्यांनी काय करायचे याची याच वयात निवड करावी म्हणजे ते विद्यार्थी स्पर्धेत टिकतात तसेच सातत्य ठेवावे असे त्यांनी बोलताना सांगितले. 


दरम्यान विध्यार्थीना खाऊ वाटप करण्यात आला, जिजाऊ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थीनी टायगर अकॅडमीच्या ग्राऊंडवर वनभोजनाचा आस्वाद घेतला. या क्षेत्र भेटीसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशव शिंदे, संस्थेच्या सचिव शर्मिला केशव शिंदे यांनी मार्गदर्शन केले तसेच उर्मिला त्र्यंबके, सरिता काळाने, निकिता माळवदे, सुरेखा शेलार, प्रतीक्षा उल्हारे, प्रियदर्शनी मुंगीकर, अर्चना म्हेत्रे, मेघा अडसूळ, आशा पवार, दत्तात्रय पवार, संतोष कोरडे, जालिंदर बनकर, पांडुळे काका यांनी सहकार्य केले,  आभार राक्षे यांनी मानले.