कर्जत (प्रतिनिधी) : मविआ सरकारच्या काळात कर्जत कोंभळी रस्त्याचे काम रखडले होते , ते आता जवळपास पूर्ण होत आहे , याचे सर्व श्रेय आ राम शिंदे यांना जात असून त्यांच्यामुळेच या रस्त्याचे रुपडे पालटले आहे, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांना माध्यमांशी बोलताना सांगितले. 

सभापती काकासाहेब तापकीर पुढे बोलताना म्हणाले की, २०१८ साली माजी मंत्री राम शिंदे यांनी हायब्रीड  ऍन्यूटि प्रकल्पाअंतर्गत कोंभळी फाटा ते कर्जत या रस्त्याच्या कामाला मंजुरी आणली होती. आणि त्यानंतर रस्त्याचे काम सुरू झाले होते, सरकार बदल झाल्यानंतर मविआ सरकारच्या काळात हे काम अडवून ठेवण्यात आले होते, तीन वर्षे होऊनही हे काम पूर्ण होत नव्हते. वनविभागाच्या परवानगीचे कारण पुढे करत लोकप्रतिनिधींनी कोंभळी फाटा ते कर्जत रस्त्याचे काम अडवून ठेवण्यात आले होते.

दरम्यान पक्षाने आ राम शिंदे यांना विधान परिषदेवर संधी देत आमदार बनवले आणि शिंदे फडणवीस सरकार देखील स्थापन झाले, लागलीच आ शिंदे यांनी या रस्त्याच्या कामाचा आढावा घेत, वनविभागाच्या परवानगी साठी संबंधित अधिकाऱ्याला सांगून परवानगी द्यायला सांगितली, त्यामुळे एकाच दिवसात कामाची परवानगीही मिळाली, आणि रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू झाले.

कोंभळी फाटा ते कर्जत रस्ता काम जवळपास पूर्ण झाल्याने या मार्गाने वाहतूक देखील वाढली असून रस्त्यालगतच्या व्यावसायिकांना देखील याचा निश्चित फायदा होणार आहे. 


तो रस्ता पोलीस बंदोबस्तात होणार. 

यावेळी काकासाहेब तापकीर यांनी सांगितले की, कोंभळी जवळ रस्त्याचे थोडे काम अपूर्ण असून याबाबत संबंधित ठेकेदाराशी बोलणे झाले असून हे काम पोलीस बंदोबस्तात लवकरच सुरू होणार आहे.