कर्जत (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोंभळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व न्यू इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांना आ रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक पॅड वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच सचिन दरेकर, चेअरमन रावसाहेब गांगर्डे, दत्तात्रय काकडे, युवा उद्योजक ऋषिकेश गोरखे, सोपान गांगर्डे, शिवाजी गांगर्डे, रुपचंद गांगर्डे, सुनील खंडागळे, धनराज गांगर्डे, बलभीम गांगर्डे, मच्छिंद्र गांगर्डे, संतराम गांगर्डे, तुषार गांगर्डे, सुभाष गांगर्डे, सिताराम गांगर्डे, चांदमल गांगर्डे, बबन गांगर्डे, भाऊसाहेब गांगर्डे, अस्लम बागवान, प्रताप गांगर्डे, आकाश गायकवाड आदींसह दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार रोहित पवार यांनी गावातील अनेक विकास कामांसाठी तसेच शाळेतील स्वच्छतागृहासाठी निधी दिला, विद्यार्थ्यांना संगणक, सायकल वाटप करण्यात आले आहे, राहिलेल्या विद्यार्थ्यांना सायकल देणार आहेत. आ रोहित पवार यांनी वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक पॅड वाटप केल्याबद्दल आभार.
- पै सचिन दरेकर , सरपंच
आ रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक पॅड वाटप करण्यात आले, यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येत होता, आ रोहित पवार हे कायम सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या व्यथा जाणून घेत असून त्यावर विविध उपाययोजना करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत.
- ऋषिकेश गोरखे, युवा उद्योजक




