खरमरे यांनी पुढे म्हंटले आहे की, बहुप्रतिक्षित तुकाई उपसा जलसिंचन योजनेला मविआ सरकारच्या ३ वर्षाच्या काळात अघोषित स्थगिती होती . योजनेचे कोणतेही काम त्या काळात सुरू नव्हते .वन विभागाची परवानगी नाही या सबवी खाली या कामाला स्थगिती देण्यात आली होती . कर्जत जामखेड चे विद्यमान आमदार रोहित पवार यांनी तुकाई उपसा जलसिंचन योजने संदर्भात अक्षम्य दुर्लक्ष केल्याने या योजनेला खिळ बसली होती आणि ३ वर्ष हे काम बंद होते .
परंतु भाजपने आमदार राम शिंदे यांची विधानपरिषद सदस्य पदी नियुक्ती केली आणि तुकाई उपसा जल सिंचन योजनेच्या कामाने पुन्हा वेग पकडला आणि कामाला सुरुवात झाली परंतु त्यामध्ये पुन्हा काही स्थानिक आणि काही प्रशासकीय कारणाने अडथळे निर्माण झाले आहेत त्याकरिता आ राम शिंदे यांनी या प्रश्नी मार्ग काढण्यासाठी जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडे या संदर्भात बैठक घेण्यासाठी वेळ मागितला होता त्या अनुषंगाने संजय राठोड यांनी ही बैठक मंत्रालय मुंबई येथे त्यांच्या दालनामध्ये १० ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता आयोजित केली आहे .या बैठकी करता आ प्रा . राम शिंदे हे उपस्थित राहणार असून तसेच प्रधान सचिव मृदू व जलसंधारण विभाग ,मंत्रालय मुंबई, अहमदनगरचे जिल्हाधिकारी, व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ , संभाजीनगर, भूसंपादन अधिकारी अहमदनगर ,सहाय्यक अभियंता,नाशिक विभाग.मृदा व जलसंधारण विभागाचे विषयांशी सर्व संबंधित अधिकारी कंत्राटदार हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी दिली.


