कर्जत (प्रतिनिधी) : सद्गुरू उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष उद्धवराव नेवसे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून तालुक्यातील ठिकठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त कर्जत येथील स्नेहप्रेम या निराधार संस्थेमध्ये फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी कर्जत तालुका केमिस्ट असोसिएशनचे मा.तालुकाध्यक्ष राम ढेरे, भाजप चे ओबीसी विभागाचे तालुकाध्यक्ष शरदराव म्हस्के, व्यापारी प्रकाश खंदारे, सुनिल भोज, सुदाम दळवी, सचिन जेवरे, प्रदिप रूद्रके, संस्था संचालक फारूक बेग आदी उपस्थित होते.
तसेच मिरजगाव येथील जिजाऊ इंग्लिश मेडियम स्कुलमध्ये वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी संस्था संचालक केशव शिंदे, पत्रकार विनायक चव्हाण, बबन म्हस्के, महमंद पठाण, बेलगावचे मा.सरपंच सदाबापू शिंदे, संतोष कोरडे , मकसूद पठाण व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त मिरजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांना विविध प्रकारची जीवनावश्यक औषधे मिळावीत म्हणून ती रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डाॅ.हर्षद दराडे, डाॅ.गिरी, आशासेविका, कुलदीप गंगावणे, शिवसेना शहरप्रमुख बबन दळवी, प्रहार सघंटनेचे जिल्हाध्यक्ष बबन म्हस्के, कर्मचारी व रूग्ण उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त मिरजगाव येथील जिल्हा परिषद शाळेत खाऊ व शालेय साहित्य वाटप करण्यात आले, यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सचांलक संपत बावडकर, मा उपसभापती प्रशांत बुध्दीवंत, मा.सरपंच सारंग घोडेस्वार, ग्रा.सदस्य सागर पवळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजी पिसे, कैलास बोराडे इजिंनिअर शरद सकट, आकाश खवळे, सदाबापू शिंदे, कुलदीप गंगावणे, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त मिरजगाव येथील श्री संत गजानन महाराज पतसंस्थेकडून सत्कार करण्यात आला.या प्रसंगी शाखाप्रमुख एकनाथ हेबांडे, कॅशियर बाळासाहेब गंगावणे, बाळासाहेब नवले, संचालक जवादे नाना , बचत प्रतिनिधि विठ्ठलराव म्हस्के, सतिष तोरडमल, नाना शेलार, तुकाराम परहर, म्हेत्रे व इतर मान्यवर उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त मिरजगाव येथील सदगुरू मल्टिस्टेट शाखेत केक कापून वाढदिवस साजरा केला यावेळेस सावता परिषदचे युवा तालुकाध्यक्ष स्विकार नेवसे, नुतन माध्यमिक शाळेचे संजय घोडके, विनित गांधी, गायकवाड, डाॅ.अशोकराव काळदाते, शाखाधिकारी शेखर नेवसे, हजारे मॅडम, कर्मचारी वैभव नेवसे , समर्थ एजन्सीचे विनायक हूमे व ग्राहक उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त राशीन येथील कामधेनु गोशाळेला गोमातेसाठी चारा देण्यात आला तसेच संस्कार बालगृहामध्ये निराधासाठी मिठाई वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. यावेळी संस्थाचालक शरदचंद्र आढाव, उद्योजक बापूराव धोंडे, औषध व्यापारी रवि काळे, यश काळे, शिवाजी काळे, व्यापारी नवनाथ जांभळकर, हरिश्चंद्र कोल्हे, बालके व ज्येष्ठ निराधार उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त राशीन येथील सदगुरू मल्टिस्टेट शाखेत केक कापून सत्कार करण्यात आला.या प्रसंगी शाखाधिकारी महेंद्र पवार, कॅशियर नितीन वाघ, आर.के एटंरप्रायझेसचे संचालक यश काळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
राशीन येथील ऊद्योजक मा.बापूराव धोंडे व मा.अंबादास गव्हाणे पाटील यांनी संस्था कार्यालयात सत्कार आयोजित केला.
कर्जत मध्ये प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी मनोगत व्यक्त करून सत्कार केला यावेळी सदगुरू जनरल्सचे संचालक प्रकाश खंदारे व महादेव खंदारे उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त कर्जत शहरात सदगुरू मल्टिस्टेट को.क्रेडिट मुख्य शाखेत केक कापून सत्कार करण्यात आला.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मेडियाचे बापू शिंदे, भाजपचे राजेंद्र येवले , व्यापारी विशाल दळवी, गणेश साखरे, अविनाश नेवसे ऑडिटर सचिन नेवसे, सदगुरू दूधचे चेअरमन अबंर भोसले,नरेंद्र ढेरे, सदगुरू मिल्कचे मॅनेजर रविंद्र थोरात, शाखाधिकारी अशोक ऊबाळे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त माहिजळगाव केक कापून सत्कार करण्यात आला..या प्रसंगी राष्ट्रवादीचे युवा नेते सावन शेटे, माळी भाऊसाहेब, सदगुरू मल्टिस्टेटचे दिपक खेडकर, अशोक कदम, सुजित गरड, अभिजित कदम, गुरूवर्य कदम व मित्र परिवार उपस्थित होता.
मिरजगाव शहरामध्ये मित्र परिवाराने केक कापून वाढदिवस साजरा केला.या प्रसंगी जामखेड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अमोल गिरमे, डाॅ.असोसिएशनचे सचिव डाॅ.सुभाष सुर्यवंशी, अध्यक्ष संजय पवार , सारंग घोडेस्वार, बबन म्हस्के, सय्यद जक्की, लहू कोरडे, भाजपाचे शहराध्यक्ष अभिजित जवादे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
मिरजगाव शहरात शिवसेना ज्येष्ठ नेते अमृत लिगंडे उपसभापती प्रशांत बुध्दीवंत, मा.ग्रा.सदस्य रामभाऊ मुरकुटे यांच्यावतीने संस्था कार्यालयात सत्कार करण्यात आला.
मिरजगाव शहरातील शिंदे हाॅस्पीटल मध्ये केक कापून सत्कार आयोजित करण्यात आला, यावेळी डाॅ.श्री प्रसाद शिंदे, डाॅ.स्नेहल शिंदे, श्री गजानन महाराज ग्रा.बिगर शेती पतसंस्थेचे संचालक अशोक काकडे, सदाबापू शिंदे, केमिस्ट खेडकर उपस्थित होते.





