कर्जत (प्रतिनिधी) : मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी खांडवी येथे चालू असलेल्या साखळी उपोषणास प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी भेट दिली, यावेळी उपोषण कर्त्यांच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ठिकठिकाणी आंदोलने, उपोषणे सुरू असून तालुक्यातील खांडवी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने उपोषण करण्यात आले, तसेच सर्वपक्षीय राजकिय नेत्यांना गावामध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे.


