कर्जत (प्रतिनिधी) : खरिपाचा शेतमाल विकून रब्बी हंगामासाठी सज्ज असलेल्या शेतकऱ्यांची आता कृषी व्यावसायिकांनी राज्यव्यापी संप पुकारल्याने कोंडी झाली आहे. राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या कायदा क्रमांक ४०, ४१, ४२, ४३. व ४४ यातील जाचक अटींच्या निषेधार्थं हा संप पुकारण्यात आला आहे. 

कर्जत तालुका सिड्स पेस्टी & फर्टी डीलर्स असोशिएशनने याबाबत तहसीलदार यांना निवेदन दिले असून  राज्य सरकारने नवीन प्रस्तावित कायद्यात ज्या जाचक अटी व नियम लागू करायचे ठरविले आहे त्याच्या विरोधात माफदा च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातले सर्व कृषी केंद्र दि. २, ३ व ४ नोव्हेंबर रोजी बंद राहणार असल्याबाबत म्हंटले आहे. आज बंदचा शेवटचा व तिसरा दिवस असून शहरासह तालुक्यातील सर्व खते बी बियाणे विक्रेते यांनी दुकान बंद ठेवून उस्फूर्तपणे बंदला प्रतिसाद दिला आहे.