कर्जत (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने आणि नाफेडणे साठ रूपये किलो दराने नागरिकांसाठी  भारत डाळीच्या नावाने तालुक्यातील कोंभळी येथे वाटप करण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा सरचिटणीस राहुल गांगर्डे, व्हॉइस चेअरमन गोरख गांगर्डे, उद्योजक संदीप गवारे, नितीन गांगर्डे, मल्हारी भापकर, वसंत गांगर्डे, बलभीम गांगर्डे, अशोक काकडे, सुरेश गांगर्डे, वैभव भंडारी, कांतीलाल माळवदकर, संजय खंडागळे आदींसह नागरिक उपस्थित होते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या धोरणानुसार प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ वंचित शोषित गरिबांच्या थेट घरापर्यंत पोहोचावा याच दृष्टिकोनातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे व या उपक्रमाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी केले आहे.