कर्जत (प्रतिनिधी) : कुळधरण  ( ता.कर्जत) येथील सहकार महर्षी बाळासाहेब बबनराव पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित या सेवा संस्थेने सभासदांची दिवाळी गोड व्हावी म्हणून सभासदांना लाभांश वाटप करण्यात आले.

 ३१ मार्च २०२२ पर्यंतच्या शेअर्स वरती ९ टक्के प्रमाणे लाभांश वाटण्यात आला.सोसायटीचे मार्गदर्शक तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा संस्थेने मागील काही वर्षांपासून उत्तम काम करत, कमावलेल्या नफ्यातून मागील वर्षी भव्य इमारत बांधली आणि चालु वर्षी देखील लाभांश वाटप केले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंगेश जगताप ,सोसायटीचे चेअरमन संजय सुपेकर ,व्हा.चेअरमन अतुल  जगताप, संचालक आबासाहेब सुपेकर, सदाशिव सुपेकर ,मच्छिंद्र सुपेकर ,सुवर्णनाथ सुपेकर ,वनिता दत्तात्रय जगताप , वर्षा बंडू सुपेकर शिवाजी सुपेकर, बापुसाहेब सुपेकर, आप्पासाहेब बोराडे नितीन गजरमल, संपत पाठक  ,संस्थेचे सचिव  निलेश सुपेकर व क्लार्क सर्जेराव शिंदे आणि इतर सभासदांच्या हस्ते सभासदांना लाभांश वाटण्यात आला.

या कार्यक्रमासाठी कुळधरणचे पोलीस पाटील समीर पाटील, मा.सरपंच अशोक  जगताप ,शेषराव सुपेकर ,कांतिलाल सुपेकर , राजेंद्र वारे आदी मान्यवर  उपस्थित होते. यावेळी सभासदांची दिवाळी गोड झाल्याबद्दल, सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व सभासदांनी सोसायटीचे आभार मानले.