कर्जत (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या मागणीस्तव सीना आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी आ प्रा राम शिंदे यांनी केली होती, त्यांनी केलेल्या मागणीला यश आले असून १८ नोव्हेंबर रोजी सीना धरणाचे पाहिले उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी संदीप शेळके यांनी दिली आहे.

              सीना परिसरात पर्जन्यमान सरासरी पेक्षा कमी झाल्याने भूजल पातळी खालवली आहे . खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे .आता शेतकऱ्यांच्या सर्व आशा आकांक्षा या रब्बी पिकावर अवलंबून आहेत पिके ऐन भरात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी पाणी आवर्तनाची मागणी आ राम शिंदे साहेब यांच्याकडे करण्यात आली होती,  त्याची तात्काळ दखल घेऊन व वस्तुस्थिती ची योग्य माहिती देऊन त्वरीत सीना धरणाचे आवर्तन सोडण्यासाठी संबंधिताना योग्य ते आदेश आ शिंदे यांनी दिले आहेत.

         दरम्यान त्यानुसार सीना धरणाचे  उजव्या कालव्याद्वारे आवर्तन शनिवार १८ नोव्हेंबर रोजी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अपुऱ्या पावसामुळे सीना पट्ट्यातील पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली होती, या आवर्तनामुळे सीना पट्टयातील पिकांना जीवदान मिळणार आहे. योग्य वेळेस आवर्तन सुटणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शेतकर्यांची मागणी लक्षात घेऊन तात्काळ निर्णय करून संबंधिताना पाणी सोडणयाचे आदेश आ राम शिंदे यांनी दिल्यामुळे सीना परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांना धन्यवाद दिले असल्याची माहिती भाजप तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.