कर्जत (प्रतिनिधी) : रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानत अल्पावधीत आपल्या रुग्ण सेवेच्या बळावर नावारूपाला आलेले कर्जत  येथील श्री साई सिद्धी लहान मुलांचे हॉस्पिटल स्थलांतर व उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला.

आपल्या रुग्णसेवेच्या जोरावर तालुक्यातील पालकांचा व रुग्णांचा विश्वास संपादन केलेले हॉस्पिटलचे संचालक बालरोग तज्ञ डॉ प्रमोद जगताप व  त्वचारोग तज्ञ डॉ सोनल जगताप यांच्या हॉस्पिटलचे उद्घाटन सर्वसामाजिक संघटनेच्या शिलेदारांकडून करण्यात आले.

 या उद्घाटन सोहळ्यास शुभाशीर्वाद म्हणून दयानंद महाराज कोरेगावकर तसेच प्रमुख उपस्थिती आमदार निलेश लंके , माजी मंत्री आ राम शिंदे, सुनंदाताई पवार ,प्रवीण घुले, अशोक खेडकर, डॉ.दिलीप बागल, नगरसेवक , डॉक्टर्स ,सरपंच व पदाधिकारी, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संकेत मोरे यांनी केले, या कार्यक्रमात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप व्हरकटे, डॉ राजेश तोरडमल ,डॉ मधुकर कोपनर, हॉस्पिटलचे संचालक बालरोग तज्ञ डॉ प्रमोद जगताप यांनी मनोगते व्यक्त केली.  आभार त्वचारोग तज्ञ डॉ सोनल जगताप यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी  मेडिकल असोसिएशन व लॅब संघटना यांचे सहकार्य लाभले.

श्री साई सिद्धी लहान मुलांचे हॉस्पिटल स्थलांतर व उद्घाटन झाले असून डॉ साळवे हॉस्पिटल समोर शहाजीनगर, कर्जत येथे रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.