कर्जत (प्रतिनिधी) : रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी अनेक तरुण , नागरिक रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेत असतात, या रक्तदान चळवळीत रक्तदाता ही तितकाच महत्वाचा असल्याचे प्रतिपादन भाजपचे कर्जत तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी केले.
ते कर्जत तालुक्यातील कोंभळी येथे माजी मंत्री आ प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आई जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
खरमरे पुढे बोलताना म्हणाले की आपले रक्त दुसऱ्याचे जीवन आहे. याच भावनेतून अनेक रक्तदाते रक्तदान करत असतात. अनेक वेळा रुग्णालयांना रक्ताचा तुटवडा जाणवतो, कोरोना काळात रक्त, प्लाझ्मा, प्लेटलेट्स या सगळ्यांची किती गरज होती याचा अनुभव आपणा सर्वांनाच आला आहे, रक्तदान करून आपण एखाद्या व्यक्तीला जीवदान देऊ शकतो, त्यामुळे रक्तदानाचे महत्व लक्षात घेऊन आमचे नेते आमदार राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिरास तरुणांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला, दरम्यान जनकल्याण रक्तकेंद्र अहमदनगर यांनी ५० बॅग रक्तसंकलन केले.
यावेळी माजी सरपंच रावसाहेब गांगर्डे, चेअरमन ज्ञानदेव गांगर्डे, अमोल गांगर्डे, विकास संस्थेचे उपाध्यक्ष गोरख गांगर्डे, भगीरथ गांगर्डे, संदीप गवारे, प्रकाश पठारे, डॉ राजेंद्र गांगर्डे, चांदमल गांगर्डे, शिवाजी भापकर, किशोर गांगर्डे, नितीन गांगर्डे, अनिल गांगर्डे, संतोष शेलार, प्रविण गांगर्डे आदींसह मोठ्या संख्येने तरुण व नागरिक उपस्थित होते.


