कर्जत (प्रतिनिधी) :  आरोपी सचिन हरिदास राठोड, हरिदास रूपचंद राठोड, अमोल हरिदास राठोड व एक महिला (सर्व राहणार सोनक पिंपळगाव तालुका अंबड जिल्हा जालना) यांची श्रीगोंदा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील केस मधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी यांनी दिनांक 10 एप्रिल रोजी आरोपी यांचे विरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात भा द सं कलम 494 , 506, 34 व बालविवाह प्रतिबंध अधिनियम 1929 चे कलम 9, 10 प्रमाणे फिर्याद दिली होती त्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास करण्यात आला व सदर केस मध्ये आयपीसी कलम 376 (2 )(I)( N) व बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम 2012 कलम 3,4,5, (L) (N), 6 हे कलम सदर केस मध्ये वाढवण्यात आले.

फिर्याद मुलीचे वडिलांनी दिलेली असून त्यांचे म्हणण्याप्रमाणे आरोपी सचिन हरिदास राठोड याचे बरोबर इतर आरोपी यांनी  सिद्धटेक येथे सचिनचे दुसरे लग्न लावून दिले व लग्नाचे वेळी मुलीचे वय सोळा वर्षे होते असे त्यांचे म्हणणे होते, लग्नानंतर सदर आरोपी सचिन राठोड व पीडित मुलगी हे एकत्र राहिले व आरोपी सचिन हरिदास राठोड यांनी वेळोवेळी पिढीत मुलगीचे बरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले अशी फिर्याद देण्यात आली होती 

सदर फिर्यादीप्रमाणे न्यायालयात दोषारोप पत्र दाखल होऊन सदरची केस न्यायालयात चालली परंतु सदर केस फिर्यादी पक्षाचा पुरावा हा पुरेसा नसलेले सबळ पुराव्या अभावी व आरोपींचे वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींची दिनांक 2 जानेवारी रोजी निर्दोष मुक्तता केली दरम्यान आरोपी यांच्या वतीने अँड क्षीरसागर भाऊसाहेब पांडुरंग यांनी केसचे कामकाज पाहिले