कर्जत(प्रतिनिधी) : मतदार संघामध्ये वाढदिवसाचा कार्यक्रम सप्ताह असतो परंतु यावर्षी वाढदिवस पंधरवडा साजरा होत आहे . लोकांमध्ये उत्साह आहे, उत्स्फूर्ततेने हे कार्यक्रम केले जात आहेत . शेवटी लोकांना आपला तो आपलाच हे कळलेलं आहे . सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मन असते असे म्हणत त्यांनी शरीर संपदा जोपासण्याचा सल्ला तरुणांना दिला .. यावर्षी कर्जत जामखेड मतदार संघामध्ये विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी हा वाढदिवस साजरा करणेत येत आहे असे प्रतिपादन आ प्रा राम शिंदे यांनी केले.
ते तालुक्यातील कोरेगाव येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त पै . अजित ( दादा ) शेळके मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धांच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
या ठिकाणी आजी माजी महाराष्ट्र केसरी पैलवान यांनी हजेरी लावली, तसेच महाबली, हिंदकेसरी पै. सतपाल सिंग यांची प्रमुख उपस्थिती स्पर्धेचे आकर्षण ठरले . माझ्या वर महाराष्ट्राने खूप प्रेम केले आहे . महाराष्ट्रा मधून ऑल्मिपिक विजेता झालेला आहे . पुन्हा एकदा ऑल्मिपिक चे पदक भारताला मिळावे . मी मोफत प्रशिक्षणाची सोय केलेली आहे . त्याचा लाभ महाराष्ट्राने घ्यावा अशी विनंती पै सतपाल सिंग यांनी यावेळी केली.
या ठिकाणी कुस्ती मैदानात खास आकर्षण असणारी शेवटची मानाची कुस्ती डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध सेनादल पैलवान राकेश कुमार यांच्यात पार पडली. यामध्ये पैलवान शिवराज राक्षे विजयी ठरला. या कुस्ती मैदानासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
त्यामध्ये पै सतपाल सिंग दिल्ली, हिंदकेसरी अभिजीत कटके, ऑलम्पिक वीर डीवायएसपी राहुल आवारे, महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे, महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर ,महाराष्ट्र केसरी चंद्रास निमगिरे व उपमहाराष्ट्र केसरी पैलवान मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
तसेच भाजपा तालुकाध्यक्ष शेखर खरमरे,जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर ,जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, अशोक खेडकर, पै प्रविण घुले पाटील, काका धांडे, सोमनाथ पाचरणे , उद्योजक महेश तनपुरे, पप्पू धुमाळ, पै डॉ भिसे,यांची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी विविध गावचे सरपंच, उपसरपंच, आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते तर हजारोंच्या कुस्तीप्रेमी संख्येने उपस्थित होते . सर्वांचे स्वागत पै युवराज शेळके व पै अजित शेळके यांनी केले तर सूत्रसंचालन श्री उदय सिंग परदेशी यांनी केले . मैदान संपल्यानंतर सर्वांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती ..सर्व उपस्थित मान्यवरांचे व कुस्तीप्रेमींचे निळकंठ शेळके यांनी आभार मानले.


