कर्जत (प्रतिनिधी) : माझ्या विरोधकांना हे सुद्धा माहीत नव्हतं की, जामखेडची एमआयडीसी नसून ती एक प्रायव्हेट वसाहत आहे, माझ्या अगोदरचे आमदार मंत्रिपद मिरवण्यात व्यस्त असल्याने मागे पडलेले नगर सोलापूर व श्रीगोंदा जामखेड रोडचे काम गडकरी साहेबांना विनंती करून मार्गी लावले , अशी टीका आ रोहित पवार यांनी आ राम शिंदे यांचे नाव न घेता केली, ते तालुक्यातील कोंभळी येथे विविध  विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

 आ पवार पुढे बोलताना म्हणाले की, बारामती मध्ये एमआयडीसी पहिली एमआयडीसी सहाशे एकराची आली होती, पण कर्जत जामखेड मध्ये हजार एकराची एमआयडीसी व्हावी ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची इच्छा होती अधिकाऱ्यांना सांगितलं होतं मतदारसंघांमध्ये तुम्हाला जो काही सर्वे करायचा आहे तो करा कोणती गावी घ्यायची ते मला सांगू सुद्धा नका असा एक सर्वे करा ज्यामध्ये आपल्याला हजार एकराची एमआयडीसीसाठी जागा मिळेल फॉरेस्ट चा परिसर जास्त असल्याने बऱ्याच ठिकाणी सर्व केल्यानंतर असे जाणवले की 200 च्या वर एमआयडीसी साठी जागा उपलब्ध होत नाही त्यामध्ये एक ठिकाण असे सापडले की त्या ठिकाणी 1100 एकर जागा एमआयडीसीसाठी होती ते म्हणजे पाटेगाव त्याठिकाणी जवळून महत्वाचे दोन महामार्ग जात असल्याने ते ठिकाण फायनल करण्यात आले होते.

आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील कोंभळी गावातील 612 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला यामध्ये कोंभळी कौडाने ते बिटकेवाडी रोड, निमगाव गांगर्डा ते बारडगाव सुद्रिक रोड, कोंभळी रवळगाव ते रोटेवाडी रोड यांचे भूमिपूजन करण्यात आले, तसेच खुली व्यायाम शाळा लोकार्पण पार पडले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव तनपुरे, कोंभळी गावचे सरपंच सचिन दरेकर, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश काका गोरखे, चिंचोली रमजान जी सरपंच महेश काळे, रूपचंद गांगर्डे, तात्या डेरे, सेवा संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट रावसाहेब गांगर्डे, चेअरमन मारुती गांगर्डे,विनायक भापकर चांदमल गांगर्डे, वसंत गांगर्डे, भाऊसाहेब काकडे, बाळासाहेब गांगर्डे, धनराज गांगर्डे, शिवाजी भापकर, शरद भापकर, निखिल गांगर्डे, अमोल गांगर्डे, शिवाजी गांगर्डे, विठ्ठल गांगर्डे, सुनील खंडागळे, नितीन गांगर्डे, संदीप भापकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.