कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील गोल्डन रॉयल इंडस्ट्रीचे संचालक युवा उद्योजक निलेश काकडे यांना नुकतेच महाराष्ट्र उद्योजकता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी नगर येथील हॉटेल ताज बाय विवंटा येथे ११ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमात सोलर आणि एलईडी लाईट ची टॉप ची कंपनी म्हणून कर्जत , अहमदनगर येथील गोल्डन रॉयल इंडस्ट्रीचे संचालक युवा उद्योजक निलेश काकडे यांना मराठी सिनेअभिनेत्री स्पृहा जोशी यांच्या हस्ते महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सोलर आणि एलईडी लाईट क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. अहमदनगरसह अनेक जिल्ह्यात सोलर, एलईडी लाईट क्षेत्रात निलेश काकडे अनेक वर्षांपासून कार्यरत आहे त्यांना महाराष्ट्र उद्योग अवार्ड २०२४ मराठी सिनेअभिनेत्री स्पृहा जोशी यांच्या हस्ते देण्यात आला. मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. निलेश काकडे यांनी कमी वेळात सोलर व एलईडी लाईट क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. महाराष्ट्र उद्योग अॅवार्ड देऊन गौरवण्यात आल्याने त्यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
काकडे यांचे भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, सरपंच सचिन दरेकर, संतोष साके मेजर, प्रगतशील शेतकरी अमोल गागडॅ, व्हॉइस चेअरमन गोरख गागडॅ, रूपचंद गागडॅ, उद्योजक संदिप गवारे यांनी अभिनंदन केले



