कर्जत (प्रतिनिधी) : सरकार हमसे डरती है । इडी को आगे करती है । अशा घोषणा मुंबईतील ईडी कार्यालया समोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे कार्यकर्ते जोर जोरात देत होते कारण होते त्यांच्या युवा नेत्याची इडी कार्यालयाकडून गैरव्यवहारासाठी चौकशी सुरु होती असे म्हणत  भाजपा तालुकाध्यक्ष  शेखर खरमरे यांनी आ रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे.

           माध्यमांना दिलेल्या माहितीत खरमरे यांनी म्हंटले आहे की, खरंच, सरकार नावाची यंत्रणा यांना घाबरते? सरकारने भिती घ्यावी असे यांचे कर्तृत्व काय? महाराष्ट्रात सर्वाधिक जनमत यांच्या बाजूने आहे का?,.. तर तसे अजिबात दिसत नाही. तसे असते तर निदान विधी मंडळातील ताकदीवर पक्ष आणि चिन्ह गमवावे लागले नसते.

                    स्वतः आ रोहीत पवार प्रतिनिधित्व करत असलेल्या कर्जत जामखेड मतदार संघात संघटनात्मक परिस्थिती अतिशय कमकुवत असल्याचे कालच्या तालुका कार्यकारिणी निवडीवरून जाणवते  . तालुका संघटनेच्या निवडीसाठी स्वतः श्री जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष दोन दिवस ठाण मांडून बसतात त्यांच्या बरोबर युवकचे प्रदेशाध्यक्ष ही असतात त्यानंतरही कार्यकारिणी निवड पूर्ण होत नाही ही वस्तुस्थिती संघटनेची ताकद किती? हे दर्शविते असे खरमरे म्हणाले आहेत.

                 तालुका कार्यकारिणी निवडतानाही लोकशाहीचे संकेत हे पायदळी तुडवले जातात . प्रदेश कार्यालयाने तालुका प्रमुख निवडून मग त्याने त्याला आवश्यक अशी तालुका कार्यकारिणी निवडावी असा संकेत आहे . लोकशाही प्रणाली मध्ये निदान तेव्हढे स्वातंत्र्य तरी तालुका प्रमुखाला असते पण इथेही घराणेशाही असलेल्या पक्षात हे स्वातंत्र्य मान्य नाही . प्रथम कार्यकारिणीची निवड आणि मग त्यांचा प्रमुख निवडणार अशी अजब पक्षांतर्गत लोकशाही हे राबवतात. आता अशी लोकशाही मूल्य यांच्या तालुका प्रमुखाला किवा कार्यकारिणी सदस्याला कोणते विचार स्वातंत्र्य देणार .? अशा घराणेशाही असलेल्या प्क्षात फक्त आणि फक्त त्या कुटुंबाचे हित संबंध जपायचे असतात . मुळात इथे स्वतंत्र विचार मान्यच नाही . अशा संघटनेत प्रत्येक ठिकाणी लोकशाही मूल्य पायदळी तुडवली जातात आणि पुन्हा लोकशाहीच्याच नावाने गळे काढले जातात हे विशेष.. फक्त आणि फक्त कौटुंबिक विचार अशा घराणेशाही असलेल्या पक्षात होत आहे अश्या शब्दात खरमरे यांनी आ पवार यांच्यावर टीका केली.

                 खरमरे पुढे म्हणाले,   थोडा तार्किक विचार केला तर, लोकशाही मान्य नाही का? असा सवाल यांना विचारला तर लोकशाही संवर्धनाचा ठेका  फक्त यांनीच घेतलेला आहे अशी यांची वक्तव्ये असतात . संवैधानिक तपास यंत्रणांची स्वायतत्ता यांना मान्य नाही कारण प्रत्येक यंत्रणा यांच्या दृष्टीने फक्त यांच्याच विरोधात काम करते आहे . असा यांचा नेहमीचा लोकप्रिय युक्तिवाद असतो.

                     लोकशाही मध्ये बहुसंख्य किंवा बहुमत हा मुख्य आधार आहे त्या दृष्टीने विचार केला तर यांच्याकडे तेही नाही म्हणजे लोकांनी ही यांना नाकारलेले आहे मग सरकार नावाचे सामुहिक नेतृत्व किंवा यंत्रणा यांना  घाबरते असा सोयीस्कर गैरसमज स्वतःच्या मनाची समजूत घालण्याकरिता हे करत असावेत आणि त्यासाठी पैसा हेच साधन आहे, त्याचाच वापर करून ईडी कार्यालया बाहेर घोषणाबाजी केली जाते विशेष हे आहे कि त्याच अवैध मार्गाने कमविलेल्या पैशाची चौकशी त्याच कार्यालयात सुरु आहे . पैसा बोलता है , खरोखर सामान्य माणसाला विचार करावयास भाग पाडणारी घटना आहे असे खरमरे यावेळी म्हणाले.

                        आ . रोहीत पवार हे प्रतिनिधित्व करत असलेल्या मतदार संघात ज्या प्रकारे त्यांच्या पक्षीय संघटनेच्या संघटनात्मक निवडी करतात त्यावरून हेच समजते कि लोकशाही यांना मान्य नाही आणि यांना जनाधार ही नाही . या संघटनात्मक निवडी म्हणजे स्वतः च्या घराणेशाहीच्या उबदार गोधडीला वाचविण्यासाठीची  लोकशाहीच्या मखमली पांघरूणाखालील धडपड आहे बाकी काही नाही अशी टीका भाजपाचे तालुकाध्यक्ष  शेखर खरमरे यांनी प्रसिद्धी पत्रकात केली आहे .