कर्जत (प्रतिनिधी) : आमदार प्रा. राम शिंदे दोन फेब्रुवारीला मिरजगाव आले असता शेतकऱ्यांकडून सीनाधरणातून आवर्तन सोडण्याची मागणी केली असता आमदार प्रा.राम शिंदे तात्काळ मान्य करून फोन करून संबंधित अधिकाऱ्यांला सीनाधरणातून आवर्तन सोडण्याबाबत सुचना दिल्या असून काही शेतकऱ्यांकडून ऊस तोडून जाण्यास अडचणी  येतात त्यामुळे ऊस तोडणी झाल्यावर आवर्तन  सोडावे अशी विनंती केल्याने आवर्तनाला उशीर झाला असून याबाबत कुणीही श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये तसेच  दोन दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांकडून बैठक घेऊन आवर्तन सोडण्याबाबत निर्णय होणार आहे असे प्रतिपादन भाजपा शहराध्यक्ष संदिप बुध्दिवंत केले आहे.