कर्जत (प्रतिनिधी) :  शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी नेहमीच आक्रमक भूमिका आ . प्रा राम शिदे साहेब यांनी घेतलेली आहे . यापूर्वीही दूधदरा बाबत ची भूमिका त्यांनी विधान परिषद सभागृहार अतिशय अभ्यास पूर्ण मांडली होती . शेतकऱ्यांच्या मनातील अचूक भावना त्यांनी त्यामधून व्यक्त केल्या होत्या . त्यांची भूमिका मान्य करून शेतकऱ्यांना न्याय दिला असता तर आज दूध दराबाबतची शेतकर्यांची नाराजी ओढवली नसती ....

                        भाजपा महायुती सरकार मधील महत्वाचा आणि सर्वात मोठा घटकपक्ष असला तरी शेतकरी प्रश्नावर आ प्रा राम शिंदे साहेब हे नेहमीच शेतकऱ्यांच्या न्याय हककाच्या बाजूने उभे राहिलेले आहेत . गाव चलो अभियानामध्ये प्रवासी म्हणून त्यांनी निमगाव गांगर्डा या ठिकाणी प्रवास केला त्यावेळी ज्या समस्या नागरिकांनी मांडल्या त्या अनुषंगाने त्यांनी सरकार दरबारी पाठपुरावा केला .. अधिकारी यांनी दिशाभूल करणारी माहिती सरकारला दिली ज्यायोगे शेतकऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागले तसेच एका इमारत हस्तातरण प्रश्नी ही दप्तर दिरंगाई झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले परंतु त्यावर ही कारवाई चालढकल झाली असल्याचे दिसून येत आहे .

                            सदर प्रश्नी जिलहा नियोजनच्या बैठकीत आ प्रा राम शिंदे यांनी आक्रमकपणे भूमिका मांडत संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी केली परंतु सभागृहात त्यांना अश्वासित करणेत आले परंतु अद्याप कारवाई नाही म्हनून मग आ प्रा राम शिंदे यांना आजचा उपोषणाचा निर्वाणीचा इशारा द्यावा लागला आहे .

                           भारताचे लोकप्रिय पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून गांव चलो अभियान राबवले गेले त्याची संकल्पनाच मुळात योजनांची अंमलबजावणी तळागाळातील शेवटच्या घटका पर्यत कशा पद्धतीने होते आहे यांचा संघटना म्हणून मागोवा घेणे, लाभार्थ्यांची योजनेबाबतची मते जाणून घेणे, योजनांचा जनमासा वरील होणारा दृश्य परिणाम ज्यायोगे समाज जीवनातील सकारात्मक बदल अवलोकित करणे अशा उद्दिष्टांनी हे अभियान प्रेरित होते . महायुती सरकार जर भाजप संघटनेच्या उद्दिष्टाना हरताळ फासण्याचे काम करत आहे का? सरकार म्हणून एका लोक प्रतिनिधीचे उपोषण करणे हे सरकारचे अपयश नाही का? भाजपा संघटना म्हणून जे उपक्रम राबविते त्या उद्दिष्टांना यामुळे हरताळ फासला जात आहे .

                                महायुतीच्या सरकार मध्ये भाजप मोठा घटक पक्ष म्हणून सहभागी आहे परंतु जनतेच्या प्रश्नावर सरकारची अशी भूमिका कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करणारी आहे आणि संघटनेच्या दृष्टीने ही खूप भूषणावह गोष्ट नक्कीच नाही . सरकारने याचा विचार करावा . भाजप संघटना कर्जत म्हणून नेहमीच शेतकरी प्रश्नावर आम्ही शेतकरी हिताच्या बाजूने ठाम उभे आहोत असे मत भाजपा तालुकाध्यक्ष श्री शेखर खरमरे यांनी यावेळी व्यक्त केले .