कर्जत (प्रतिनिधी) : लहापनी आई गेल्यानंतर मोठ्या जिद्दीने शिक्षण घेऊन नौकरीला लागलेल्या रजनी गांगर्डे यांनी जेथे बदली होईल तेथे चांगले काम करून सर्वसामान्यांच्या मुलांना घडवण्याचे काम केले असून त्यांचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद जनरल बॉडी सदस्य बाबासाहेब भोस यांनी केले, ते तालुक्यातील कोंभळी येथील न्यू इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् च्या प्राचार्या रजनी अविनाश गांगर्डे यांच्या सेवापूर्ती च्या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी बोलताना प्राचार्या रजनी गांगर्डे यांनी त्यांच्या लहानपणापासून च्या आठवणींना उजाळा दिला, यावेळी त्या भावुक झाल्या होत्या, त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या कोंभळी शाखेला, गावातील शाखा असल्याने १ लाख रुपये देण्याची घोषणा केली, कोंभळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी प्राचार्या रजनी गांगर्डे यांच्या शैक्षणिक कार्याला उजाळा देत त्यांचे कौतुक केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद जनरल बॉडी सदस्य बाबासाहेब भोस, सभापती काकासाहेब तापकीर, माजी विभागीय अधिकारी तुकाराम कण्हेरकर , जनरल बॉडी सदस्य बाजीराव कोरडे, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, भाजप तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, माजी सहाय्यक विभागीय शिवाजी तापकीर, अविनाश गांगर्डे, कोंभळी चे सरपंच सचिन दरेकर, घोगरगावचे सरपंच बाळासाहेब उगले, खोसे, राशीन चे मुख्याध्यापक दिलीप खंडागळे, कोळगावचे प्राचार्य शहाजी हिरडे,आयबीचे पियुष गांगर्डे, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य राजकुमार चौरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रकांत साळुंके, प्राचार्य दादासाहेब गांगर्डे, सेवा सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब गांगर्डे, मुख्याध्यापक सुधाकर गांगर्डे, संचालक नंदकुमार नवले आदींसह पदाधिकारी, ग्रामस्थ ,  शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.