कर्जत (प्रतिनिधी) : आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कार स्पर्धेत कर्जत तालुक्यातील खांडवी या ग्रामपंचायतीने बाजी मारली असून तालुका स्तरावरील प्रथम क्रमांकाचे बक्षीस खांडवी ग्रामपंचायतीस जाहीर झाले आहे. त्यामुळे  खांडवी गावची समृद्ध गावच्या दिशेने वाटचाल होताना दिसून येत आहे.

 आर आर पाटील सुंदर गाव सन 2022-23 अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदशनाखाली अभियानात उत्कृष्ट काम करणा-या ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात आली होती.या तपासणीत सन 2022-23 या वर्षात तालुकास्तरावर आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये निर्धारित निकषामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातुन सर्वाधिक गुण प्राप्त केले असल्याने खांडवी या गावास तालुकास्तर आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव म्हणुन गौरविण्यात आले आहे.

गावची समितीने तपासणी केली. यावेळी समितीमार्फत गावातील शाळा,अंगणवाडी,पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत,घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन व स्वच्छता विषयक आदी कामांची पहाणी करण्यात आली होती.सदर समितीने प्रदान केलेल्या गुणांच्या आधारे निकाल जाहीर केलेला असुन  सन 2022- 23 तालुकास्तर आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव म्हणुन गौरविण्यात आले आहे.

अहमदनगर येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते खांडवी चे सरपंच प्रविण तापकीर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास खा. सदाशिव लोखंडे, खा. सुजय विखे, जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले,  पंचायत समितीचे अधिकारी राजा अटकोरे, सरपंच प्रविण तापकीर, ग्रामसेवक शेलार यू बी , संजय कांबळे, प्रकाश पठारे, दादासाहेब उल्हारे, शहाजी तापकीर, भाऊसाहेब पठारे, कुंडलिक सांगळे, प्रमोद तापकीर, अभिजित तापकीर, विशाल खोटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल खांडवीचे सरपंच , पदाधिकारी, ग्रामस्थांचे विविध क्षेत्रामधून अभिनंदन होत आहे. 

आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव तालुका स्तराचे  बक्षीस मिळाले ही गावासाठी अभिमानास्पद बाब आहे. याचे श्रेय यामध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ यांना जाते.  आगामी काळात गावातील सर्वच घटकांवर काम करून गावचे नाव समृद्ध गाव योजनेही झळकवण्याचा मानस आहे.

- प्रविण तापकीर (सरपंच, खांडवी)